Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

एनआरएमयू कल्याण मेन व कसारा शाखेचे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न.

 


प्रतिनिधी : आनंद भालेराव

एनआरएमयू कल्याण मेन शाखा व कल्याण–कसारा शाखेच्या वतीने महामंत्री वेणु पी. नायर (मध्य रेल्वे व कोकण रेल्वे) यांच्या आदेशानुसार आज दिनांक ५ मार्च २०२६ रोजी दुपारी तीन वाजता एनआरएमयू कल्याण मेन शाखेच्या पटांगणात वार्षिक अधिवेशन (सर्वसाधारण सभा) उत्साहात पार पडले.


सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर दोन्ही शाखांचे सचिव कॉ. अमित भगत (कल्याण शाखा व सहायक महामंत्री मुख्यालय) आणि कॉ. अमित इंगळे (सचिव, कसारा शाखा) यांनी उपस्थित सदस्यांसमोर मागील वर्षाचा इतिवृत्तांत वाचून दाखवला. सभेत सर्वानुमते तो मंजूर करण्यात आला. याचबरोबर वर्षभर केलेल्या विविध कामांचा आढावा सादर करून तोही सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

मागील वर्षाचा जमा-खर्चाचा अहवाल खजिनदार कॉ. शांताराम नाईक व पाटील बुवा सदगीर यांनी सभेसमोर सादर केला. हा अहवालही सर्वानुमते मंजूर करण्यात आला. एनआरएमयू ही संविधान व सर्व धर्म समभाव मानणारी संघटना असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.


यावेळी कॉ. पी. जे. शिंदे (झोनल सचिव), कॉ. रसिक मलबारी (कार्यकारी अध्यक्ष, मुख्यालय), कॉ. जॉन ओमन (सचिव, मुख्यालय), कॉ. संतोष कुमार (सहायक महामंत्री, मुख्यालय) व कॉ. अमित भगत (सहाय्यक महामंत्री, मुख्यालय) या मान्यवरांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. कामगारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

फेडरेशन मुंबई मंडळातून कॉ. अरुण मनोरे (कार्यकारी अध्यक्ष), कॉ. जे. एन. पाटील (अध्यक्ष), कॉ. आनंदा भालेराव (सचिव) तसेच कॉ. प्रल्हाद खंदारे (अध्यक्ष, कसारा शाखा) उपस्थित होते. महिला विभागातून कॉ. स्मिता जाधव (अध्यक्ष), कॉ. मंगला भागवत, कॉ. संगीता म्हात्रे व कॉ. ज्योती पवार यांचीही उपस्थिती होती. कल्याण मेन शाखा व कसारा शाखेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या शेवटी कॉ. उमेश वाघ (अध्यक्ष, कसारा शाखा) आणि कॉ. सुवास देशमुख (अध्यक्ष, कल्याण मेन शाखा) यांनी उपस्थितांचे आभार मानले. “कॉ. वेणु पी. नायर महामंत्री जीके लाल सलाम, एनआरएमयू जिंदाबाद” अशा घोषणा देत सभेची सांगता करण्यात आली.


Tags

Post a Comment

0 Comments