वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज
कल्याण : कल्याण समन्वय समिती व महिला आघाडी यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महिलांसाठी आयोजित केलेल्या संगीत खुर्ची या खेळाने करण्यात आली.
हा कार्यक्रम नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या अध्यक्ष कॉ. कामाक्षी बागलवाडीकर व कार्यकारी अध्यक्ष कॉ. मानसी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमास कॉ. रसिक मलबारी, कॉ. जे. एन. पाटील, कॉ. संतोष कुमार, कॉ. देशमुख, कॉ. सुनील ठेंगे, कॉ. सतीश, कॉ. इंगळे, कॉ. श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच कॉ. स्मिता जाधव, कॉ. मंगला भागवत, कॉ. ज्योती पवार, कॉ. सुनिता शिंदे, कॉ. मनीषा मस्के, कॉ. जयश्री पलक आदी महिलांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला सुमारे २०० महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान कॉ. संतोष कुमार, कॉ. रसिक मलबारी, कॉ. मानसी जोशी आणि कॉ. कामाक्षी बागलवाडीकर यांनी महिलांना मार्गदर्शन करत महिला सक्षमीकरण, संघटन व सामाजिक एकतेचे महत्त्व याविषयी विचार मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉ. संगीता माने होत्या. त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी उपस्थितांनी “नॅशनल रेल्वे मजदूर युनियन जिंदाबाद”, “आदरणीय महामंत्री कॉ. वेणूजी नायर सर जिंदाबाद” आणि “महिला शक्ती जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.



Post a Comment
0 Comments