Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

समाजासाठी झटणाऱ्या लढवय्या कार्यकर्त्याला सलाम – राज्यसचिव - वैभवजी गिते सर नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

 


कार्यकारी संपादक : रितेश साबळे

आज दिनांक 10 एप्रिल रोजी सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढा देणारे, वंचितांच्या हक्कासाठी आवाज उठवणारे लढवय्ये कार्यकर्ते वैभवजी गिते यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याची व्यापक दखल घेतली जात आहे.


वैभवजी गिते यांनी आंबेडकरी विचारधारेतून प्रेरणा घेत समाजातील दुर्बल, शोषित व वंचित घटकांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. अन्यायाविरोधात ठाम भूमिका घेत त्यांनी अनेक प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अत्याचारग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने, निवेदने व जनजागृती मोहिमा राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

गंभीर गुन्ह्यांतील पीडित कुटुंबांना मदत, पुनर्वसन व न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून समाजातील अनेकांना आधार देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. केवळ आंदोलन नव्हे तर अभ्यासपूर्ण मांडणी, ठोस भूमिका आणि समाजपरिवर्तनाचा ध्यास हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरले आहे.


तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करून सामाजिक प्रश्नांवर विचार करण्याची प्रेरणा देणे, हेही त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे अंग आहे. त्यामुळेच वैभवजी गिते हे आजच्या युवकांसाठी प्रेरणास्थान बनले आहेत.


आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृत्तरत्न नव महाराष्ट्र न्यूज परिवार यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून, त्यांच्या पुढील आयुष्यातही असेच समाजकार्य अखंड सुरू राहो, हीच शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments