प्रतिनिधी : आनंद भालेराव
कसारा तालुका शहापुर येथील जिल्हा परिषद शाळा शिदवाडी येथे दिनांक 09 एप्रिल 2026 रोजी विश्वरत्न, बोधिसत्त्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने शाळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, फोटो, वही, पेन यांचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम आर.पी.आय. ठाणे जिल्हा सचिव आयु. आत्मारामजी पगारे, आयु. कृष्णा भोसले (वासिंद), माळेगावचे रहिवासी आयु. लकी जाधव (उपाध्यक्ष, वासिंद शहर) तसेच भिमाकोरे गाव जयस्तंभ संवर्धन बचाव समिती यांच्या वतीने राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. देवदास भाऊ दोंदे होते. यावेळी आयु. मंगेश उबाळे, आयु. राहुल शेठ वाढविंदे, आयु. महेश भाऊ वाढविंदे, आयु. राजरत्न जाधव तसेच परिसरातील इतर मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गीतांजली बाबासाहेब काशिद, सहशिक्षक श्री. अमोल तुकाराम बुधवंत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आयु. चंदर सकरू रेरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.


Post a Comment
0 Comments