Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

एका विधवा महिलेला फॅमिली पास मिळवून देण्यात यश.

 


प्रतिनिधी : आनंदा भालेराव

ऑल इंडिया रेल्वे पेंशनर वेल्फेयर फेडरेशन यांच्या माध्यमातून एका विधवा महिलेला न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले. दिनांक 26/05/2026 रोजी श्रीमती मालतीबाई, स्वर्गीय मोतीराम पाटील यांच्या पत्नी यांना त्यांच्या हक्काचा फॅमिली पास मिळवून देण्यात यश आले.


मागील सन 2004 पासून त्यांनी मुंबई मंडळाच्या पास विभागातून फॅमिली पास घेतला नव्हता. फॅमिली पास कुठून आणि कशाप्रकारे मिळवायचा याची माहिती त्यांना नव्हती. कसारा शाखेचे उपाध्यक्ष कॉ. बालाराम वायले हे नात्यातील असल्यामुळे ही बाब त्यांच्या निदर्शनास आली.


त्यानंतर आवश्यक सर्व कागदपत्रे व पुरावे गोळा करून मुंबई मंडळाच्या पास विभागात सादर करण्यात आले. तसेच तेथील चीफ ओ.एस. साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित विधवा महिलेला सहकार्य करण्यात आले आणि अखेर त्यांना त्यांच्या हक्काचा फॅमिली पास मिळवून देण्यात आला.


सेवानिवृत्त कामगारांच्या प्रश्नांसाठी कार्य करत असताना कॉ. जे. एन. पाटील अध्यक्ष मुंबई मंडळ, कॉ. वसंत कासार ऑर्गनायझेशन सेक्रेटरी मुंबई मंडळ, कॉ. अरुण मनोरे कार्यकारी अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली कॉ. आनंदा भालेराव सचिव मुंबई मंडळ, कॉ. दिलीप शिंदे ऑर्गनायझेशन सेक्रेटरी कसारा शाखा, कॉ. बालाराम वायले तसेच मुंबई मंडळ पास विभागातील कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Post a Comment

0 Comments