कार्यकारी संपादक : रितेश साबळे
छत्रपती संभाजीनगर, दि. ३० मे : रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने सिडको एन-७ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांची भेट घेण्यात आली. मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर बौद्ध समाजातील महिलांविषयी अश्लील व आक्षेपार्ह पोस्ट करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विलास काकडे (मो. क्र. ७३५०८१४१२१), रा. मिसरवाडी, छत्रपती संभाजीनगर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मानसी म्हस्के यांनी संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदविला असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे जिल्हाप्रमुख दिनेश गवळे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा सचिव रवि मोरे, कामगार आघाडीचे शहराध्यक्ष संतोष उनवणे, पूर्व शहराध्यक्ष राहुल खरात, सुनील वाहुळ, मध्य शहराध्यक्ष सिद्धार्थ बोर्डे, प्रकाश घोरपडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या तसेच महिलांविषयी अश्लील व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली.

Post a Comment
0 Comments