Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

संस्कार, सेवाभाव आणि माणुसकीचा दीप उजळला.

प्रतिनिधी : आनंदा भालेराव

वेहळोली ता. शहापूर जि. ठाणे येथे दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता स्वर्गीय सरीता दशरथ जाधव यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम अत्यंत भावनिक आणि समाजमनाला स्पर्श करणारा ठरला.


स्वर्गीय सरीता दशरथ जाधव या केवळ कुटुंबवत्सल मातोश्री नव्हत्या, तर संस्कार, कर्तव्य, संयम आणि माणुसकीचा जिवंत आदर्श होत्या. त्या स्वर्गीय दशरथ कृष्णा जाधव, सेवानिवृत्त फॉरेस्ट अधिकारी यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना अभिवादन केले.


कार्यक्रमातील धार्मिक विधी आयु. चिंतामण रामा खंडागळे (बौद्धाचार्य, क्रेडिट शिक्षक व कार्यालयीन सचिव, मुरबाड तालुका) यांच्या हस्ते अत्यंत शांत, शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात पार पडले. यावेळी त्यांनी स्वर्गीय सरीता जाधव यांच्या जीवनकार्याचा गौरव करत त्यांच्या सेवाभावी व संस्कारमय व्यक्तिमत्त्वाची आठवण उपस्थितांसमोर मांडली.


या कार्यक्रमास आयु. बी. डी. जाधव (सेवानिवृत्त सहायक जिल्हाधिकारी), कालुराम जाधव, सिद्धार्थ जाधव, बंदू जाधव, सुभाष जाधव तसेच काॅ. आनंदा धोंडीबा भालेराव (सचिव, ऑल इंडिया रेल्वे पेन्शनर वेल्फेअर फेडरेशन, मुंबई मंडळ) यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सेवानिवृत्त वनरक्षक आयु. सुरेश धनगर, मुरबाड यांनीही उपस्थित राहून आदरांजली अर्पण केली.


कार्यक्रमात उपस्थितांनी स्वर्गीय सरीता जाधव यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक व कौटुंबिक योगदानाचे कौतुक केले. संपूर्ण वातावरण श्रद्धा, आदर आणि भावनांनी भारावून गेले होते.


Post a Comment

0 Comments