प्रतिनिधी -शंकर गायकवाड
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र अंतर्गत जिजाऊ संघटना अंबाड़ी यांच्या वतीने अल्प दरात घरघंटी वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिजाऊ कार्यालय अंबाड़ी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये एकूण ५० महिलांना अल्प दरात घरघंटीचे वाटप करण्यात आले. महिलांच्या दैनंदिन जीवनात आर्थिक बचत व्हावी तसेच घरगुती व्यवसायाला चालना मिळावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती जिजाऊ महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिकाताई पानवे यांनी दिली.
यावेळी भिवंडी लोकसभा अध्यक्ष जिजाऊ संघटना मोनिका पानवे, जितेंद्र पाटिल,रुपेश पाटिल,भूपेंद्र पाटिल आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन करत अशा सामाजिक उपक्रमांमुळे महिलांचे सक्षमीकरण होत असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ संघटना अंबाड़ी यांच्या वतीने करण्यात आले होते. समृद्धि ठाकरे,संदीप ठाकरे,रोहिणी पाटिल,मृणाली पाटील,आयुष भोईर यांनी विशेष मेहनत घेऊन हा कार्यक्रम संपन्न केला. उपस्थित महिलांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.


Post a Comment
0 Comments