प्रतिनिधी : आनंदा भालेराव
मुरबाड : भारतीय बौद्ध महासभा मुरबाड तालुक्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, मुरबाड येथे दिनांक २५ मे २०२६ ते २९ मे २०२६ दरम्यान दररोज दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत बाल धम्म संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास बालकांसह पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका पालकमंत्री संजय भालेराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. शिबिरामध्ये दररोज तालुक्यातील विविध भागांतून भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक तसेच बौद्धाचार्य उपस्थित राहून बालकांना धम्म संस्कार, नैतिक मूल्ये, शिस्त, सामाजिक जाणीव आणि मानवतेचे धडे देण्याचे कार्य करीत आहेत.
या कार्यक्रमास आयु. ॲड. शरद हरिचंद्र थोरात (अध्यक्ष), आयु. योगिता ताई खंडागळे (महिला अध्यक्षा), आयु. विजय खोळांबे (उपाध्यक्ष, संस्कार विभाग), आयु. भगवान देसले (सचिव), आयु. भाऊ खोळांबे (खजिनदार) यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित राहून सहकार्य करीत आहेत.
तसेच भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ नेते आयु. पुंडलिक चंदने (बाबा), आयु. नागेश थोरात (माजी अध्यक्ष) तसेच महिला व पुरुष कार्यकारिणीचे पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेत असून बाल धम्म संस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देत आहेत.

Post a Comment
0 Comments