Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

पाच दिवसीय बाळ धम्म संस्कार शिबिराचा मुरबाडमध्ये उत्साहात समारोप.

 


प्रतिनिधी -शंकर गायकवाड 

मुरबाड : भारतीय बौद्ध महासभा मुरबाड तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय बाळ धम्म संस्कार शिबिराचा सांगता समारोप सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दि. 25 मे 2026 ते 29 मे 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल 45 बालकांनी सहभाग घेत धम्म संस्कारांचे धडे घेतले.


भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यू. जी. बोराडे साहेब व राज्य सरचिटणीस अशोक केदारे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच ठाणे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी व जिल्हा सरचिटणीस छगन सुरवाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.


मुरबाड तालुका अध्यक्ष ॲड. शरद हरिश्चंद्र थोरात व महिला अध्यक्ष योगिता खंडागळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात बालकांना धम्म, संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय बौद्ध महासभेची स्थापना, कार्य व उद्दिष्टे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.


समारोप कार्यक्रमात ठाणे जिल्हा हिशोब तपासनीस भरत घनघाव साहेब, ठाणे जिल्हा संघटक व मुरबाड तालुका पालकमंत्री संजय भालेराव साहेब, केंद्रीय शिक्षक कांतिलाल भडांगे सर, केंद्रीय शिक्षिका महानंदा चोपडे ताई यांनी उपस्थित राहून बालकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

शिबिरादरम्यान ठाणे जिल्ह्यातील केंद्रीय शिक्षक व शिक्षिका दररोज उपस्थित राहून मुलांना धम्म संस्कारांचे प्रबोधन करत होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका सरचिटणीस भगवान देसले गुरुजी, महिला सरचिटणीस ज्योती अहिरे ताई, कोषाध्यक्ष भाऊ खोळंबे गुरुजी, महिला कोषाध्यक्ष अनिता अहिरे ताई, संस्कार उपाध्यक्ष विजय खोळंबे गुरुजी, प्रचार पर्यटन उपाध्यक्ष पुंडलिक चंदने गुरुजी, माजी अध्यक्ष नागेश थोरात गुरुजी, तेजा खंडागळे ताई, सविता भोईर ताई यांच्यासह पुरुष व महिला कार्यकारिणीने विशेष मेहनत घेतली.


शिबिरासाठी विविध मान्यवर व समाजहितैषी व्यक्तींनीही सहकार्य केले. मुरबाड नगरपंचायतीचे नगरसेवक रवींद्र देसले यांनी मुलांसाठी लाडू-फरसाणची व्यवस्था केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे ठाणे जिल्हा सरचिटणीस शरद सोनावणे यांनी विद्यार्थ्यांना पेन वाटप करत आर्थिक धम्मदान दिले. तसेच प्रशांत धनगर, अजित अनिल थोरात, भगवान उबाळे, विजय वाढविंढे, कांचन उघडे आणि महिला वॉर्ड शाखेच्या पदाधिकाऱ्यांनीही विविध स्वरूपात सहकार्य केले.


समारोप कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, बौद्धचार्य, ग्रामस्तरावरील कार्यकर्ते आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्कार उपाध्यक्ष विजय खोळंबे गुरुजी यांनी भूषविले. सूत्रसंचालन भगवान देसले गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन भाऊ खोळंबे गुरुजी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments