प्रतिनिधी : आनंद भालेराव
मनमाड : संघर्ष, त्याग आणि समर्पणाचे प्रतीक असलेल्या माता रमाई आंबेडकर यांच्या ९१ व्या स्मृतिदिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी, मनमाड शहर शाखेच्या वतीने विनम्र अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवासात माता रमाई यांनी मोलाची साथ दिली. अत्यंत कठीण परिस्थिती, दुःख आणि अनेक संकटांचा सामना करत त्यांनी बाबासाहेबांना समाज व देशाच्या उन्नतीसाठीच्या लढ्यात खंबीर आधार दिला. त्यांच्या अढळ पाठिंब्यामुळे परिवर्तनाच्या इतिहासाला नवी दिशा मिळाली. माता रमाई यांचे जीवन आजही धैर्य, संयम आणि समर्पणाची प्रेरणा देणारे आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. आम्रपाली निकम व शहर महासचिव अमोल केदारे यांनी माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सदर कार्यक्रमास शहराध्यक्ष विलास अहिरे, जिल्हा सचिव कादिर शेख, उपाध्यक्ष निलेश निकम, सागर गाडे, सोमनाथ मोरे, निलेश अहिरे, मनमाड शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी "जय भीम, जय संविधान" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Post a Comment
0 Comments