Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

अतिक्रमणाच्या नावाखाली बुद्धमूर्ती व स्मारकाची तोडफोड; बौद्ध समाजात संताप.

 


प्रतिनिधी : आनंद भालेराव

कल्याण (वालधुनी) : आशोक नगर, वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशन परिसरात अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान भगवान बुद्धांच्या मूर्तीची विटंबना तसेच स्तूप आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकात्मक स्मारकाची तोडफोड झाल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेबाबत बौद्ध समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.


या घटनेचा बुद्धभूमी फाउंडेशन व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला आहे. संबंधित प्रशासनिक व पोलीस अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नातेवाईक अभिषेक थोरवे यांना ४७४ कोटी रुपयांचा ठेका मिळवून देण्यासाठी बौद्ध अस्मितेवर घाला घालण्यात आला आहे. तथापि, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून संबंधित यंत्रणेकडून याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.


भगवान बुद्धांच्या मूर्तीची विटंबना व बौद्ध समाजाच्या श्रद्धास्थानांची तोडफोड करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सर्व समाजबांधवांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून बौद्ध समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.


Post a Comment

0 Comments