Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

NEET UG 2026 प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी ठाण्यात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा एल्गार; शिक्षणातील भ्रष्टाचाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

प्रतिनिधी : आनंदा भालेराव

ठाणे : सम्यक विद्यार्थी आंदोलन व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने दिनांक 29 मे 2026 रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करून NEET UG 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, शिक्षण क्षेत्रातील वाढता भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणाच्या विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


देशभरात गाजत असलेल्या NEET UG 2026 परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या अथक मेहनतीवर तसेच पालकांनी केलेल्या आर्थिक व मानसिक संघर्षावर पाणी फेरले गेले आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.


यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आयु. अनिकेत बंडू मोरे, महासचिव आयु. राजू खरात, कल्याण-डोंबिवली शहराध्यक्ष आयु. कमलेश उबाळे, ठाणे जिल्हा सदस्य आयु. सुशांत साबळे यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या गैरप्रकारांविरोधात कठोर पावले उचलावीत आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता अबाधित राखावी, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी यावेळी मांडली.

Post a Comment

0 Comments