Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

रिपब्लिकन सेनेचा जातीय उपवर्गीकरणाला तीव्र विरोध! भांडुप पोलीस ठाण्यात निवेदन सादर; निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा.

 


प्रतिनिधी :-शंकर गायकवाड 

मुंबई:-अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) करण्याच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन सेनेच्या वतीने भांडुप पोलीस ठाणे येथे निवेदन सादर करण्यात आले. समाजामध्ये जातीजातीत संघर्ष निर्माण होऊ नये आणि सामाजिक ऐक्य अबाधित राहावे, अशी भूमिका यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.


रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा इंदू मिल स्मारक प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. संविधान आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांच्या विरोधात जाऊन जातीय वर्गीकरण लागू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.


शासनाने जबरदस्तीने उपवर्गीकरण लागू करण्याचा प्रयत्न केल्यास आंबेडकरी समाज लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. समाजात तेढ निर्माण करणारे निर्णय तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.


यावेळी विजय माने, नागेश खैरमोडे, श्यामराव रोकडे, शैलेश गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments