Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

कल्याण येथे आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन व बुद्ध जयंती उत्साहात साजरी.

 


कल्याण (प्रतिनिधी) : दिनांक १ मे २०२६ रोजी एन.आर.एम.यू.च्या वतीने कल्याण इन्स्टिट्यूट येथे आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन व बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


कार्यक्रमाची सुरुवात कल्याण मेन ऑफिसपासून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने झाली. रॅलीदरम्यान महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आदरणीय महामंत्री कॉ. वेणु पी. नायर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यानंतर कल्याण इन्स्टिट्यूट येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात कॉ. पी. जी. शिंदे, कॉ. आर. के. मलबारी, कॉ. पटेरिया व कॉ. संदीप जाधव यांनी कामगारांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले.


आदरणीय महामंत्री कॉ. वेणु पी. नायर यांनी आपल्या प्रभावी भाषणातून कामगार चळवळ, चार लेबर कोड आणि सध्याच्या परिस्थितीत संघर्षाची गरज यावर सविस्तर भाष्य केले.

कार्यक्रमातून “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश दृढ करण्यात आला. उपस्थित कामगार व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.

Post a Comment

0 Comments