Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

वैशाख पौर्णिमेनिमित्त श्रावस्ती बुद्ध विहारात कार्यक्रम उत्साहात.

 


प्रतिनिधी : आनंद भालेराव

वासिंद : भारतीय बौद्ध महासभा शाखा वासिंद पूर्व यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता “श्रावस्ती बुद्ध विहार” येथे वैशाख पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाखेच्या अध्यक्षा आदरणीय ज्योतीताई कोबाळकर यांनी भूषवले. हा कार्यक्रम केंद्रीय शिक्षिका आदरणीय निर्मलाताई गांगुर्डे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.


भगवान बुद्ध यांच्या २५७० व्या जयंतीनिमित्त (वैशाख पौर्णिमा) कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली. त्यानंतर अष्टशील, महामंगल गाथा आणि परित्राण पाठ आदरणीय बौद्धाचार्य गांगुर्डे गुरुजी यांनी घेतले. तसेच या सर्व गाथांचा अर्थ आदरणीय बौद्धाचार्य घोडेस्वार गुरुजी यांनी उपस्थितांना साध्या व सोप्या भाषेत समजावून सांगितला.

या कार्यक्रमात खिरदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. निर्मलाताई गांगुर्डे व त्यांच्या परिवाराने खिरदान दिले. तसेच रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय अंजलीताई संजय भालेराव यांनी बुद्ध पौर्णिमेच्या औचित्याने विहारात ५००० रुपयांचे धम्मदान दिले.


कार्यक्रमासाठी सर्व धम्म उपासक व उपासिका शुभ्र वस्त्र परिधान करून वेळेवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केंद्रीय शिक्षिका व भारतीय बौद्ध महासभा शाखा वासिंद पूर्व यांच्या उपाध्यक्षा निर्मलाताई गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ‘सरणतेयं’ घेऊन करण्यात आली.

Post a Comment

0 Comments