Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

वाढत्या महागाईविरोधात अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचा भव्य बैलगाडी मोर्चा.


प्रतिनिधी : रितेश साबळे

अकोला : वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ तसेच सरकारच्या धोरणांविरोधात वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.


या आंदोलनात बैलगाड्या, घोडे तसेच गाढवांसह नागरिक सहभागी झाले होते. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना पेट्रोल व डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसत असून इंधन टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

मोर्चादरम्यान विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी सरकारने तातडीने महागाई नियंत्रणात आणून पेट्रोल-डिझेल दर कमी करावेत, अशी मागणी केली.


मोर्चाच्या शेवटी अकोल्याचे निवासी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी हजारो नागरिक, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments