Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

मुरबाड नगरपंचायतीत “संविधान चौक” नामकरणाचा ठराव एकमताने मंजूर.

 


प्रतिनिधी : आनंदा भालेराव

मुरबाड - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत मुरबाड नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत “संविधान चौक” नामकरणाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. मुरबाड–कर्जत मार्गावरील म्हसा मोरेवी येथील सहयोग प्लाझा इमारतीसमोरील चौकाला “महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक” असे नाव देण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला.


आजाद समाज पार्टी (काशीराम) यांच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीला अखेर यश मिळाले. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तसेच मुरबाड विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा प्रस्ताव नगरपंचायतीच्या सभेपुढे मांडण्यात आला होता. विषय क्रमांक १२ अंतर्गत हा ठराव सभेत सादर करण्यात आला असून त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.


संविधान, समता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना अभिवादन करणारा हा निर्णय असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या निर्णयामुळे आंबेडकरी समाजासह संविधानप्रेमी नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Post a Comment

0 Comments