Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

मुरबाड तालुक्यात खळबळ : १३ वर्षीय मुलाकडून शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला.

मुरबाड | प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील शिवळे गाव येथे अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली असून, अवघ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने एका शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगा चोरीच्या उद्देशाने शिक्षिकेच्या घरात शिरला होता. यावेळी शिक्षिकेने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता संतापाच्या भरात आरोपी मुलाने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. या हल्ल्यात शिक्षिका गंभीर जखमी झाल्या आहेत.


घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना सतर्क नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी शिक्षिकेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.


या घटनेमुळे शिवळे गावासह संपूर्ण मुरबाड तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments