प्रतिनिधी :शंकर गायकवाड
अकोट : वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढ तसेच केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक २५ मे २०२६ रोजी अकोला येथे भव्य ‘बैलगाडी मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी अकोट येथे जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा सकाळी ९ वाजता निघणार असून, केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर टीका करत, “जनतेला इंधन बचतीचे आवाहन केले जाते, मात्र सत्ताधारी स्वतः सरकारी वाहनांच्या ताफ्याचा वापर करून उधळपट्टी करत आहेत. जनतेसाठी एक नियम आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा नियम अशी दुटप्पी भूमिका सरकारची आहे,” असा आरोप केला.
तसेच वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि सामान्य नागरिकांच्या वाढत्या अडचणींविरोधात हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बैठकीत २५ मे रोजी होणाऱ्या ‘बैलगाडी मोर्चा’त मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. गोरगरीब व सामान्य जनतेने या आंदोलनात सहभागी होऊन सरकारविरोधातील संताप व्यक्त करावा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.


Post a Comment
0 Comments