Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

NEET पेपरफुटी प्रकरणी संतापाचा उद्रेक; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

 

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्यव्यापी धरणे आंदोलन, विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज बुलंद.

औरंगाबाद | प्रतिनिधी । रितेश साबळे

NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.


यावेळी आंदोलकांनी NEET पेपरफुटी प्रकरणातील निष्काळजीपणा आणि गैरव्यवहारांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व स्पर्धा परीक्षांशी संबंधित विविध प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.


आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या हिताच्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या प्रतिनिधींनी सादर केले. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


या धरणे आंदोलनात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबाद पश्चिम जिल्हाध्यक्ष रुपचंद गडेकर, युवा आघाडीचे पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments