प्रतिनिधी - शंकर गायकवाड
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा इंदू मिल स्मारक आंदोलनाचे प्रणेते सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय, वाशी येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
समाजातील गरजू, आजारी आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांप्रती संवेदनशीलता व्यक्त करत हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांना धीर व मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
रिपब्लिकन सेनेच्या वतीने दरवर्षी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा वाढदिवस सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणपूरक व जनकल्याणकारी उपक्रमांनी साजरा केला जातो. त्याच परंपरेचा भाग म्हणून हा उपक्रम सेवाभावाने व उत्साहात पार पडला.
यावेळी रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा, समता आणि मानवतेचा संदेश देत सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.

Post a Comment
0 Comments