Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

मुंबईचे शिल्पकार नामदार नाना शंकर शेठ यांच्या १६१ व्या पुण्यतिथीनिमित्त मुरबाडमध्ये अभिवादन.

 


📰 मुरबाड | प्रतिनिधी-आनंदा भालेराव 

मुरबाड : मुंबईचे शिल्पकार, थोर समाजसुधारक आणि मुरबाडचे भूमिपुत्र नामदार नाना शंकर शेठ यांच्या १६१ व्या पुण्यतिथीनिमित्त मुरबाड दैवेज्ञ समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि. ३१ जुलै) श्रद्धाभावाने अभिवादन करण्यात आले.


यावेळी मुरबाड तिनहात नाका परिसरातील नामदार नाना शंकर शेठ यांच्या नामफलकास तसेच मुरबाड नगरपंचायत कार्यालयातील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी नाना शंकर शेठ यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि सार्वजनिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांच्या कार्याला उजाळा दिला.


या कार्यक्रमास मुरबाड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मोहन गडगे, उपनगराध्यक्षा नम्रता नितीन तेलवणे, नगरसेविका स्नेहा सागर चंबवणे तसेच दैवेज्ञ समाजातील आजी-माजी पदाधिकारी, समाजबांधव आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments