मुरबाड | प्रतिनिधी - आनंदा भालेराव
भारतीय बौद्ध महासभा, मुरबाड तालुका पुरुष व महिला कार्यकारणीच्या वतीने धम्म परिषदेच्या आयोजनाच्या नियोजनासाठी संयुक्त महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या धम्म परिषदेच्या नियोजनासंदर्भात ही बैठक घेण्यात आली.
भारतीय बौद्ध महासभा मुरबाड तालुका अध्यक्ष आयु. शरदजी थोरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष आयु. विजयजी गायकवाड गुरुजी, जिल्हा हिशोब तपासणीस तथा मुरबाड तालुका प्रभारी आयु. भरत घनधाव, संस्कार सचिव आयु. कांतीलाल भडांगे आदी मान्यवरांनी उपस्थित उपासक-उपासिकांना मार्गदर्शन केले.
बैठकीस पुरुष व महिला कार्यकारणीचे भाऊ खोलांबे, नागेश थोरात, पुंडलिक चंदने, सुभाष जाधव, दत्तात्रय थोरात, किशोर गायकवाड, महिला अध्यक्षा अनिताताई अहिरे, ज्योतीताई अहिरे, सविताताई भोईर, वार्ड अध्यक्षा सुशिलाताई अहिरे यांच्यासह मुरबाड तालुक्यातील मोठ्या संख्येने उपासक-उपासिका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस भगवान देसले सर यांनी केले. कोषाध्यक्ष भाऊ खोलांबे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी व उपासक-उपासिकांचे आभार मानले. त्यानंतर बैठकीची सांगता करण्यात आली.



Post a Comment
0 Comments