प्रतिनिधी:-तेजस घोसाळे
संगमनेर :- बौद्ध समाजातील युवक-युवतींना उद्योग, व्यवसाय आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून सक्षम करण्याच्या उद्देशाने बुद्धिस्ट नेटवर्क सोसायटी, संगमनेर - अकोले तालुक्याच्या वतीने "बौद्ध उद्योजक मेळावा" शनिवार दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी व्यापारी असोसिएशन हॉल,संगमनेर येथे आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यात उद्योग-व्यवसायाच्या संधी, कौशल्यविकास आणि समाजाच्या आर्थिक प्रगतीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. मोहन शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक व सामाजिक विचारांच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासावर मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र घोसाळे, उद्योजक व संस्थापक-अध्यक्ष, तेजस सेवा प्रतिष्ठान यांनी “आंबेडकरी जनतेने उद्योग-व्यापारात येणे काळाची गरज” या विषयावर आपले विचार मांडले.
यावेळी बदलत्या काळानुसार युवकांनी नवीन कौशल्ये शिकून उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे यावे, यावर वक्त्यांनी विशेष भर दिला. तसेच या मेळाव्याच्या माध्यमातून युवकांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण करण्यासोबतच स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आणि समाजाच्या आर्थिक विकासात योगदान देण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमास उद्योजक दीपक जाधव, रावसाहेब जगताप, अमोल कदम, सुरेशराव अभंग,आकाशभाऊ गोडगे, सचिन शिंदे,संतोष रोहम, सुदाम खरात साहेब, संतोष गायकवाड, सचिन साळवे,सोमनाथ भालेराव, दादाभाऊ जमधडे सर,संदीप भोसले, भूषण घोसाळे, कैलास मोकळ तसेच महिला उद्योजिका सुकेशनी कांबळे, शुभांगी वाघमारे, वैशाली निळे, शैला भालेराव, संध्या खरे, मनिषा खंडागळे तसेच आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते माणिकराव यादव, दिलीपराव रुपवते, प्रा. गंगाधर लांडगे, ए पी बनसोडे सर, साहित्यिक के जी भालेराव सर, विनय घोसाळे सर, के एस गायकवाड सर,प्रा शांताराम रायसिंग, आनंदराव जमधडे साहेब, रघुनाथ भालेराव, आदी बौद्ध समाजाचे उद्योजक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रहार मोकळ सर यांनी केले. तर मेळाव्याचे ध्येय आणि उद्दिष्टांची प्रस्तावना बाबा मोकळ साहेबांनी केली.


Post a Comment
0 Comments