Type Here to Get Search Results !

Objectives

Objectives

अडीच वर्षांपासून प्रलंबित शेतरस्त्याच्या प्रश्नावर अखेर लेखी आश्वासन; उपोषणाची सांगता.

 


सहसंपादक - शंकर गायकवाड 

सागद, ता. बाळापूर : अडीच वर्षांपासून शेत रस्ता मोकळा करून मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने सागद येथील शेतकऱ्यांनी दि. 14 सप्टेंबर 2026 पासून उपोषण सुरू केले होते. या प्रश्नाची दखल घेत वंचित बहुजन युवा आघाडीच्या पुढाकाराने संबंधित प्रशासनाशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.


यावेळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार झोडगे साहेब, तहसीलदार वैभव फरताडे साहेब, गटविकास अधिकारी दीपक सवडे साहेब तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष सुगतभाऊ डोंगरे, नागेश वानखडे पारस सर्कल महासचिव भाग दोन, अमर खंडारे, युवराज डोंगरे, विजय पातोडे मा सरपंच, महादेव कराळे, गजानन कराळे उपस्थित होते.

उपोषणास बसलेले शेतकरी सुधाकर तायडे, अनिल भारसाकडे, भगवान उमरावते, गुलाबराव इगळे, प्रकाश दामोदर, नागेश गवारगुरु, एकनाथ कराळे, संपत भारसाकडे व रामेश्वर तायडे यांना प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात आले.


लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतकऱ्यांना ज्यूस पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.


शेतकऱ्यांच्या शेतरस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments