भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, बौद्धाचार्यांचे जनक, चैत्यभूमीचे शिल्पकार तथा माजी आमदार सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण आंबेडकर कुटुंबासह त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
भैय्यासाहेब आंबेडकर यांनी समाजाचे संघटन, प्रबोधन तसेच बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी आयुष्यभर महत्त्वपूर्ण योगदान दिले. चैत्यभूमीच्या उभारणीपासून बौद्धाचार्यांच्या माध्यमातून धम्मकार्याला संघटित स्वरूप देण्यापर्यंत त्यांनी केलेले कार्य आंबेडकरी चळवळीच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय मानला जातो.
त्यांचा संघर्ष, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. महापुरुषांनी निर्माण केलेली चळवळ केवळ स्मरणात न ठेवता त्यांच्या विचारांना कृतीत उतरवून पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरते.
यावेळी समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि बौद्ध धम्माच्या मूल्यांसाठी आपली वाटचाल अधिक दृढ करण्याचा संकल्प करण्यात आला.

Post a Comment
0 Comments